Tuesday, September 1, 2009

मिती-चार,कल्याण!

मिती-चार,कल्याण!
प्रायोगिक नाट्यसंस्था.

मिती-चार,कल्याण ही तांत्रिकद्रुष्टया एक नाट्यसंस्था आहे.अन्यथा ही एक चळवळ आहे.
ह्या चळवळीच्या केंद्रस्थानी आहे जाणिवापूर्वक जगणे,माणसाच्या जगण्याचे असंख्य आयाम समजावून घेउन प्रगल्भ होणे.नाटक हे निमित्तमात्र ,किवा नाटक हे त्यासाठी निवडलेल एक माध्यम आहे.
मिती-चार,कल्याण ही चार पाच लोकांनी एकत्र येउन स्थापन केलेली संस्था नव्हे.१९९४ पासून श्री रविंद्रे लाखे कालावधि नसलेली शिबिरे घेत आहेत.अनेत तरुण ह्या शिबिरात येउन गेले.
ज्यांना मिती-चार चे धोरण पटले ते टिकले.त्यांचीच ही संस्था.
संस्था नाटक सादर करते,तेव्हा स्वत:ला महत्वाचे मानत नाही किंवा आलेल्या प्रेक्षकाला महत्वाचे मानत नाही.संस्था नाटक सादर करते तेव्हा नाटक महत्वाचे मानते,- जे रंगकर्मीची आणि प्रेक्षकांची जीवनजाणीव सखोल करणारे असते.
एकंदरीत काय तर मिती-चार,कल्याण ही एक "प्रक्रिया" असणार आहे,-एक प्रवास आहे!